मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) उघडकीस आला आहे.

पुणे: मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा (Pune Kondhwa News) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) उघडकीस आला आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे.

buzz4ai

समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने ह प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी फिर्याद दिली आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे.

मुलाच्या आईने घडलेला प्रकार सांगितला भावाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारले असता बहिणीने घडलेला धक्कादायक प्रकार मामाला सांगितला आहे. नऊ वर्षाचा पीडित हा 10 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील उस्मानिया मशिदीत त्याच्या मित्रासह नमाज पठणसाठी गेला होता. यावेळी नमाज झाल्यानंतर मित्रासह मशिदीत तो थांबला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने पीडित अल्पवयीन व त्याच्या मित्राला तो राहत असलेल्या मशिदतील त्याच्या खोलीत नेले. तिथे त्याने नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली. त्यानंतर त्याने पीडिताच्या मित्राला जाण्यास सांगितले.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी
पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडिताने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र घरच्यांनी बदनामीच्या भीतीने कोणालाही याबाबत सांगितले नाही. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलिस (Kondhwa Police) अधिक तपास करत आहे. आरोपी सध्या फरार आहे. घडलेल्या घटनेनंतर सात दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Recent Post

जिला दण्डाधिकारी सह उपायुक्त की अध्यक्षता में हुई नार्कोटिक्स समन्वय समिति की बैठक, वरीय पुलिस अधीक्षक, एडीएम लॉ एंड ऑर्डर, एसडीएम धालभूम एवं घाटशिला व अन्य संबंधित विभागों के पदाधिकारी हुए शामिल

बिरसानागर क्षेत्र में ₹34 लाख से अधिक की छह विकास योजनाओं का विधायक पूर्णिमा साहू ने किया शिलान्यास, विकास कार्यों के प्रति प्रतिबद्धता दोहराई, कहा- मूलभूत सुविधाओं को सुनिश्चित करना उनकी प्राथमिकता।

Live Cricket Update

You May Like This

जिला दण्डाधिकारी सह उपायुक्त की अध्यक्षता में हुई नार्कोटिक्स समन्वय समिति की बैठक, वरीय पुलिस अधीक्षक, एडीएम लॉ एंड ऑर्डर, एसडीएम धालभूम एवं घाटशिला व अन्य संबंधित विभागों के पदाधिकारी हुए शामिल

बिरसानागर क्षेत्र में ₹34 लाख से अधिक की छह विकास योजनाओं का विधायक पूर्णिमा साहू ने किया शिलान्यास, विकास कार्यों के प्रति प्रतिबद्धता दोहराई, कहा- मूलभूत सुविधाओं को सुनिश्चित करना उनकी प्राथमिकता।